Advertisement
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात भाषणावर आज भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात येत आहे. यावर मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार पलटवार केला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, घराण्यातील भांडणं चव्हाट्यावर येतातच मात्र उद्धव ठाकरे यांनी कधी नातेवाईकांचा विरोधही केला नाही आणि भांडवल ही केलं नाही. ते काल शिंदेंकडून होताना दिसून आले. आमचे पैसे आमची भाकरी. विचार मात्र उद्धवजींचे ऐकायला आलोय, असं अनेकांनी शिवाजी पार्क मध्ये सांगितल. स्वतःहून येणं आणि माणसं आणणं यात फरक आहे. काल शिवतिर्थावरचा मेळावा अभुतपूर्व मेळावा असल्याचे त्या म्हणाल्या. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर तर स्टेज वर डुलक्या काढत होते. या सगळ्यांना दिसून आले आहे. नको ती वस्तू सुद्धा बिकेसीमध्ये होती म्हणजे ती पण सोय तिथे होती का? बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा होता मग अशी गल्लत कशी झाली असे ही त्या म्हणाल्या. फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. आमची स्क्रीप्ट नव्हती तो संवाद होता स्क्रीप्ट खरं बाहेर आलं आम्ही शिंदे साहेबांना चांगलं ओळखतो हे शिंदे साहेबांचे भाषण नाही ते तुम्हीच लिहून दिलेलं भाषण होतं असे म्हणत पेडणेकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
