Advertisement
मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून विरोधकांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो' असं म्हणत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचून भाषण केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता ट्वीटकरून 'भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो.राजसाहेब ते राजसाहेबच' असं म्हणत राजू पाटील यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
