Advertisement
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ या आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रियाताई भाजपची काळजी सोडा, बारामतीची काळजी करा, या शब्दांत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला होता. यानंतर चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
"ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा. माझ्या नादी लागू नका,जेव्हा पूजा चव्हाण साठी मी लढत होती, तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात कि तोंडाला लकवा मारला होता तुमच्या, या शब्दात टीका करताना चित्रा वाघ यांची जिभ घसरली. तसेच पुढे त्या म्हणाल्या की, तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा", तर या शब्दात चित्रा किशोर वाघ यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली.
