#

Advertisement

Tuesday, October 18, 2022, October 18, 2022 WIB
Last Updated 2022-10-18T11:55:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुण्याच्या नव्या शिल्पकारांचा विकास वाहून गेला !

Advertisement

पुणे : पुण्यामध्ये पावसामुळे ठिकाणी पाण्याचे तळे साचले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पुणे बदलतंय अशी शेकी मिरवली जात आहे. पण ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे राष्ट्रवादीने आता भाजपवर निशाणा साधला आहे. नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. 
पुण्यामध्ये परतीच्या पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडाला आहे. पुणे स्टेशन परिसरापासून ते दगडू शेठ हलवाई मंदिरापर्यंत पाणीच पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाण्यात गाड्या वाहून गेल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून पालिकेवर टीका केली. 
पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून पुणेकरांना धीर दिला आहे. पुण्यात प्रचंड पाऊस झाला आहे. सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. आजही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन सुळे यांनी केलं.