Advertisement
जळगाव : खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, की 'कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो. अन्याय होत असेल तर एकनाथ खडसे यांनी कोर्टात जावं'.
एकनाथ खडसे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, 'कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात. जे होत आहे ते पाहावं. अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेयांनी भाजपला पत्र दिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्षाचा आहे. या मागणीवर काहीही मत देणं त्यांनी टाळलं आहे.
