Advertisement
मुंबई : दिवाळी येत आहे. अशातच सोने-चांदी खरेदी करण्याचा कल देखील वाढला आहे. मात्र दिवाळीमध्ये दागिन्यांच्या विक्रीत वाढ होण्याच्या अंदाजाने सराफ व्यावसायिक आणि साठेबाजांनी सोने खरेदी वाढली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. मागील आठवड्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती.
आजचे सोन्या-चांदीचे भाव
गेल्या काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,450 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,670 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 553 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 55,300 रुपये प्रतिकिलो होती.
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,450 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,670 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,480 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,700 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,480 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,700 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45,480 आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,700 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 554 रुपये आहे.
