#

Advertisement

Thursday, October 20, 2022, October 20, 2022 WIB
Last Updated 2022-10-20T12:01:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ढोबळे साहेबांमुळे थकित वेतनाचा प्रश्‍न सुटला ; अनेकांच्या डोळ्यात पाणी, वस्तीगृह कर्मचाऱ्यांकडून सत्कार

Advertisement

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मागील आठ महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यातील 8 हजार 104 वस्तीगृह कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत होते. याविषयी महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत धोरवर धरले होते, हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. ढोबळे साहेबांनी "शाब्दीक मार' दिल्याने अधिकारी "सरळ' झाले आणि आठ महिने रखडलेल्या वेतनाचा प्रश्‍न अवघ्या आठ दिवसांत मार्गी लागला. ही वार्ता ऐकूण अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
महाराष्ट्र राज्यातील वस्तीगृहात काम करणारे अधिक्षक, स्वयंपाकी, चौकीदार, मदतनीस अशा निवासी राहून 24 तास काम करणाऱ्या एकूण 8 हजार 104 कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न सोडवून ढोबळे साहेबांनी या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली, त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वस्तीगृह कर्मचारी संघटनेच्या वतीने माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे साहेबांचा विशेष सत्कार केला.
अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीच्या प्रश्‍नांबाबतही आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याबरोबर बैठक आयोजित केली असून वेतनश्रेणीच्या अधीन राहून सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन ढोबळे यांनी वस्तीगृह कर्मचाऱ्यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल हुगे, पंढरपूर तालुका अध्यक्ष अमर बाबर, सोलापूर उपाध्यक्ष सचिन सुतार, अक्कलकोट तालुका अध्यक्ष धानप्पा अळळी मोरे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष तसलीम आकुंजे, माढा विशाल चौगुले, दिवटे सर, मोहोळचे आबासाहेब मोरे, माळशिरसचे बाबर सर, विठ्ठल बिराजदार, उत्तर सोलापूरचे महादेव पाटील, दक्षिण सोलापूरचे नागनाथ गरड, बार्शीचे महेश तळेकर, करमाळाचे अतुल उकळे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.