Advertisement
पुणे : बहुजन, वंचीत घटकांच्या प्रश्नांसाठी
लढा देणाऱ्या बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे
यांना "माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार 2022'ने
गौरविण्यात आले. राज्यभरातील विविध क्षेत्रात राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या
व्यक्तींचा गौरव डॉ. कलाम यांच्या जयंतीदिनी करण्यात आला. त्यामध्ये ऍड. कोमल
साळुंखे-ढोबळे यांच्या कार्याची दखल घेण्यात येऊन त्यांना सदर पुरस्काराने
गौरविण्यात आले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे ड्रिम फाउंडेशन आणि डॉ. कलाम मिशन
यांच्यातर्फे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशदाचे
उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश चव्हाण,
आमदार माधुरी मिसाळ, आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे
यांना "माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार' प्रदान
करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओसीडी मंगेश चिवटे, आशियाई
पतसंस्था फेडरशनचे ओमप्रकाश कोयते, सोलापूर महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता
चंद्रकांत दिघे, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, नादब्रम्ह इडलीचे संचालक
दत्तात्रय निडवंचे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी ड्रीम
फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, उद्योजक संकेत खारपुडे, चाणक्य
गुरकुल ऍकॅडमीच्या संचालिका संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले.
ऍड. ताईंवर शुभेच्छांचा वर्षाव...
"माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार 2022'ने गौरविण्यात आल्याने ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील अनेक मान्यवांनी शुभेच्छा दिल्या. सोलापूर जिल्हा ही ऍड. कोमलताई यांची जन्म आणि कर्मभूमी असल्याने जिल्हा तसेच मंगळवेढा मतदार संघातूनतही ताईंना शुभेच्छा दिल्या गेल्या. अनेक कार्यकर्त्यांनी समक्ष भेटून तर काही ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शाहू शिक्षण संस्थेतील अनेकांनी ताईंना शुभेच्छापर संदेश दिले. पडोळकरवाडी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री पोतदार सर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने ताईंचा सत्कार करण्यात आला.

