Advertisement
मुंबई : 'टाटा एअर बस प्रकल्पाबद्दल उद्योगमंत्री छाती ठोकपणे सांगत होते, प्रकल्प महाराष्ट्रातच येणार मग कसा निघून गेला? उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवाय, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेला. वेदांता फॉक्सकॉन, ऑगस्टपर्यंत बैठका झाल्या पण सप्टेंबबरला गुजरातकडे गेला. महाराष्ट्रातून चार मोठे प्रकल्प गुजरातकडे गेले आहे. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेड टेक पार्क, आणि आता टाटा एअरबस प्रकल्प हे चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. टाटा एअर बस प्रकल्पाबद्दल उद्योगमंत्री छाती ठोकपणे सांगत होते प्रकल्प महाराष्ट्रातच येणार मग कसा निघून गेला?उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवाय, अशी मागणीच आदित्य ठाकरेंनी केली. तसंच, 'उद्योगमंत्र्यांना स्वतःचं काम जमत नाही तीन पक्षात गेले, कॅबिनेट मंत्री राहिले तरी कार्यपद्धती शिकले अजूनही नाही, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
