#

Advertisement

Friday, October 21, 2022, October 21, 2022 WIB
Last Updated 2022-10-21T12:35:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात मुरलीधर जाधव लढणार

Advertisement

कोल्हापूर :  शिवसेना पक्षाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची पाठ त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थोपटली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर धैर्यशील माने शिंदे गटात सहभागी झाले. याच धैर्यशील माने यांच्या विरोधात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.उद्धव ठाकरे यांच्या पसंतीचे खासदार धैर्यशील माने  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवली केल्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले होते. त्यावेळी धैर्यशील माने यांच्या घरावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा काढण्यात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आघाडीवर होते. आता त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार माने यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडे लोकसभा लढण्याची पहिली मागणी कोल्हापुरातून आली आहे. यावर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मातोश्री या निवासस्थानी येऊन लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी करणारे विनंती पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं.