Advertisement
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली.
ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी अजून काही मुद्दे लेखी सादर केले आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत कॉम्लिकेटेड असल्यानं मलाही याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय निरीक्षण करत आहे. या प्रकरणात मी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. प्रवीण राऊत यांचा जामीन अर्जावर याआधीच निर्णय झाला आहे, असं म्हणत न्यायाधीशांनी राऊतांचा अर्ज फेटाळून लावला. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांना जेलमध्येच मुक्कामी थांबावे लागणार आहे.
