#

Advertisement

Friday, October 7, 2022, October 07, 2022 WIB
Last Updated 2022-10-07T11:18:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

"धनुष्यबाणा"साठीची लढाई लांबणीवर?

Advertisement

मुंबई : "धनुष्यबाण" निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हा निकाल पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्हावर निर्णय होईल. हे चिन्ह दोन पैकी एका गटाला मिळेल किंवा ते गोठवले जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता.  दरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट आज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील १८० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. शिवसैनिक आणि पदाधिका-यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ठाकरे गट आणखी काही कालावधी मागून घेणार आहे. सध्या शिवसैनिक आणि पदाधिका-यांची अडीच लाख प्रतिज्ञापत्र तयार असून ती दिल्लीत पोहोच झालेली आहेत. परंतु आणखी ५० हजार प्रतिज्ञापत्रे मुंबईतून येत असल्याच्या कारणास्तव शिवसेना आणखी कालावधी मागून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.