Advertisement
पुणे : शिवसेना आणि शिंदे गटात राजकारण सुरु आहे. या राजकीय घडामोडी एकीकडे सुरु असताना सोशल मीडियावर सध्या एक लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. शिंदे आणि ठाकरे परिवाराच्या दिलजमाईची ही पत्रिका आहे. विशेष म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं असताना शिंदे-ठाकरे कुटुंबियांच्या दिलजमाईच्या पत्रिकेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळत आहे.
जुन्नर तालुक्यातील वडगावसहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक श्री खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल आणि आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणातही लग्नपत्रिका पाहून चेहर्यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे चांगलीच करमणूक होत आहे.
