Advertisement
मुंबई : मुंबईमधलं राजकीय वातावरण दसरा मेळाव्यानिमित्त तापायला सुरूवात झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी कार्यकर्ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून यायला सुरूवात झाली आहे. पोलिसांनीही कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी खाण्याची खास सोय करण्यात आली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमधून फुड पॅकेट ऑर्डर करण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून प्रशांत कॉर्नरला तब्बल अडीच लाख फुड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. या फुड पॅकेटमध्ये कचोरी, गुलाबजाम, खाकरा यांच्यासह अन्य पदार्थही या फुड पॅकेटमध्ये असतील.
