#

Advertisement

Tuesday, October 4, 2022, October 04, 2022 WIB
Last Updated 2022-10-04T16:59:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा अस घडतय.....

Advertisement

 


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या उत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून महिलेला निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री संतोष यादव या प्रमुख पाहुण्या असतील. संतोष यादव या देशातील प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांचा जन्म 1969 साली हरियाणामध्ये झाला. मे 1993 मध्ये त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केले. त्यानंतर 1994 साली पुन्हा एकदा त्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. एव्हरेस्ट शिखर दोन वेळा सर करणाऱ्या त्या जगातील पहिल्या आहेत. यादव यांना या कामगिरीबद्दल 2000 साली पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहे. 54 वर्षांच्या संतोष यादव सध्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.