#

Advertisement

Saturday, October 15, 2022, October 15, 2022 WIB
Last Updated 2022-10-15T10:24:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

'ढाल-तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी ; चिन्ह रद्दची मागणी

Advertisement

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं आहे. पण, बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल-तलवार ही धार्मिक निशाणी असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी आता नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्याने केली आहे.
नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा च्या माजी सदस्याने आक्षेप घेत, ढाल-तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेतला आहे. 'ढाल-तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंदसिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल-तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या पाचही तखतांवर रोज ढाल-तलवारी हे पूजन केले जाते. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये, अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजितसिंग कामठेकर यांनी घेतला आहे.
त्रिशुल जेव्हा धार्मिक निशाणी असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने ते नाकारलं. जर त्रिशुल धार्मिक निशाणी असेल तर ढाल तलवार सुद्धा धार्मिक निशाणी आहे.  ढाल आणि तलवारीबाबतही निर्णय व्हावा, अशी मागणी रणजितसिंग यांनी केली.