#

Advertisement

Monday, October 3, 2022, October 03, 2022 WIB
Last Updated 2022-10-03T12:02:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सत्तेचा माज करू नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा !

Advertisement


नागपूर :
 सत्तेचा माज करू नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा, आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणारसुद्धा नाही, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे. साताऱ्याच्या मार्डीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतं, यावेळी बोलताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना थेट खडे बोल सुनावले.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. अजित पवारांनी असं वक्तव्य का केलं, याच कारणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी अजितदादा आपली सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांना सांगत आहेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अजित पवारांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी सत्तेत येण्याचं स्वप्न आता बघू नये, मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. 
अजितदादांचा माज काय असतो, हे महाराष्ट्राने अनेकदा पाहिलं आहे. त्यांचा माज साज सांगण्याची आवश्यकता नाही. सत्तेचा माज कुणीही करत नाही, आजही फडणवीस जमिनीवर आहेत. मुजोर राजवट कुणाची होती, हे महाराष्ट्राने पाहिलं. आम्ही जमिनीवर, आमचं सरकार जमिनीवर आणि जनता सुखी आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.