#

Advertisement

Wednesday, October 19, 2022, October 19, 2022 WIB
Last Updated 2022-10-19T17:43:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांसमोर मुख्यमंत्री शिंदे यांची राजकीय फटकेबाजी

Advertisement

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुका गुरूवार 20 ऑक्टोबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल रिंगणात उतरलं आहे. या निवडणुकीआधी पवार-शेलार पॅनलकडून डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक हे एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात शरद पवारांच्या समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी केली.
'थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते. संधी मिळाली की बॅटिंग करतो. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सगळ्यांच्याच आशिर्वादाने ती मॅच जिंकली. काहींचे उघडपणे आशिर्वाद होते, काहींचे आतून होते, मनापासून होते, मी काही नाव घेत नाही,' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हास्य केलं. 'पवार साहेबांचंही नेहमी मार्गदर्शन असतं, चांगल्या कामाला त्यांचा आशिर्वाद असतो,' असं विधानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. अंधेरीमध्ये पवार साहेबांनी राजकारणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सांगितलं, तो त्यांचा हक्क आहे. पवार साहेबांचा जन्म आणि माझा जन्म साताऱ्याचा जे पवार साहेबांनी सांगितलं ते आम्ही करणार, खेळात राजकारण आणायचं नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.