Advertisement
मुंबई : राज्यराज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महामंडळांच्या वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होत आहे. बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, वन मंत्री सुधीर मुनंगटीवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि बंदर विकास मंत्री दादा भूसे उपस्थित आहेत. लवकरच महामंडळांचे वाटप होणार आहे.
राज्य सरकारची जवळपास 75 मोठी महामंडळं आहेत, या महामंडळांच्या अध्यक्षांना राज्य मंत्रीपदाचाही दर्जा देण्यात येतो, त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांच्या नेत्यांकडून महामंडळ मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
राज्यामध्ये भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं सरकार आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 20 मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही आमदारांनी उघड तर काहींनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली. आता पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या आणि दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असणाऱ्या कोणत्या नेत्यांना संधी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकनात शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला एक महिन्यापेक्षा जास्तचा काळ लागला होता, त्यामुळे आता महामंडळ वाटप करताना दोन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
