#

Advertisement

Monday, October 17, 2022, October 17, 2022 WIB
Last Updated 2022-10-17T09:37:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ग्रामपंचायत निवडणुक : मविआ आघाडीवर..., भाजप-शिंदे युती पिछाडीवर

Advertisement

मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायती निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाचा पहिला कल हातात आला आहे. आतापर्यंतच्या निकालामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. तर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पिछाडीवर आहे. पक्षनिहाय निकालानुसार, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कडवी झुंज सुरू आहे.
18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. निकालाचा पहिला कल हातात आला आहे. 113 जागांचा निकाल हाती आला आहे.
यापैकी महाविकास आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप आणि शिंदे युती सरकार हे 40 जागांवर आहे. तर भाजपने आतापर्यंत सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला 15 तर काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे.  नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. आतापर्यंत 11 जागांचा निकाल हाती आला आहे. 
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील 342 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यापैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदांची बिनविरोध निवड झाली आहे. तर एका ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे 331 ठिकाणी सरपंचपदासाठी आज मतमोजणी पार पडतेय. य़ा निवडणुकीत 1339 उमेदवार रिंगणात आहेत. तर  ग्रामपंचायत मधील 3490 सदस्यांच्या जागेपैकी 4, तर 712 ठिकाणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. डहाणू तालुक्यामधे 62 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये मुख्य लढत भाजप, शिंदे समर्थक आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये होत आहे.

भाजपा - 05, काँग्रेस - ०4, राष्ट्रवादी - 01, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 01, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00