Advertisement
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती पैकी 9 जागेवर काँग्रेसचा सभापती, 3 जागेवर राष्ट्रवादीचा सभापती तर एका जागेवर शिंदे गटाचा सभापती निवडणूक आला आहे. धक्कादायक म्हणजे पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपची पाटी कोरीच राहिली आहे.
त्यामुळे आता उद्याच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, पारशिवानी, उमरेड, मौदा, कुही व भिवापूर, मौदा या पंचयातीत विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीनेने नरखेड, काटोल व हिंगणा येथे सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीची सत्ता मिळाली आहे.
या सर्वात भाजपची पाटी मात्र कोरीच राहिली आहे. सध्या सर्वांचच लक्ष अंधेरीच्या पोटनिवडणुकीकडे आहे. ही निवडणूक भाजप-शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये होणार आहे. नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहेत. परिणामी पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठं अपयश पत्करावं लागलं आहे.
