#

Advertisement

Wednesday, November 30, 2022, November 30, 2022 WIB
Last Updated 2022-11-30T12:12:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

तुकाराम मुंढेंच्या 16 वर्षांत 20 पेक्षा अधिक बदल्या

Advertisement

मुंबई : शिस्तप्रिय आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मात्र, अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची आता शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. 
तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत 16 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढे यांचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. मंगळवारी सरकारनं राज्यातील 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची देखील बदली करण्यात आली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढेंकडे आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.