#

Advertisement

Wednesday, November 30, 2022, November 30, 2022 WIB
Last Updated 2022-11-30T12:06:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. मात्र, नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्यावतीने आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. 
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईतल्या कुर्ला इथल्या जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. याआधी त्यांच्या जामीन अर्जावर 24 नोव्हेंबरला निकाल अपेक्षित होता, पण निकालाचं कामकाज पूर्ण न झाल्याने आज निकाल देण्यात आला. याआधीही मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्यावर प्रकृती अस्वस्थामुळे कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.