#

Advertisement

Wednesday, November 2, 2022, November 02, 2022 WIB
Last Updated 2022-11-02T12:56:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

नाराज बच्चू कडू यांना शिंदे सरकारकडून 500 कोटींचं "गिफ्ट"

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडामध्ये सहभागी झाले. पण, मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू नाराज आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिंदे सरकारने खास "गिफ्ट" दिले आहे. बच्चु कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी दिला जाणार आहे.
मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बच्चू कडू कमालीचे नाराज आहेत. अलीकडेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला व त्यावर पडदाही पडला. पण अजूनही बच्चू कडू नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज असलेल्या आमदार बच्चू कडू यांना खुश करण्याचा शिंदे सरकारने प्रयत्न केला आहे. सपन मध्यम प्रकल्पाला 500 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर आली आहे. कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका घेतली होती. मात्र मंत्रिपदापासून डावलल्याने बच्चू कडू नाराज आहेत.