Advertisement
इंदूर : इंदूरमध्ये मिठाईच्या दुकानात राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकीची चिठ्ठी मिळाल्यानं मोठी खळबळ. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना मारण्याची धमकी. कुरियरच्या मार्फत चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. इंदूरमध्ये बॉम्ब स्फोट घडवून हत्या करण्याची धमकी या चिठ्ठीतून देण्यात आली आहे. राहुल यांच्यासह मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही जीवे मारण्याची धमकी दिलीय. 24 नोव्हेंबरला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये असणार आहे. त्यामुळे पोलिसांनी आता प्रकरणाची कसून तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबईसह ठिकठिकाणाहून निघालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिखलीत जोरदार निदर्शनं केली. शेगावच्या दिशेनं निघालेल्या या कार्यकर्त्यांना चिखलीत अडवण्यात आलं. मनसे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणीच ठिय्या मांडला आणि रस्त्यावर असलेली राहुल गांधींची पोस्टर्सही फाडण्यात आली. यावेळी पोलिसांनी संदीप देशापांडे, नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधवांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सर्वांना चिखलीतल्या गेस्ट हाऊसवर ठेवण्यात आलंय. राहुल गांधींच्या सभेत राडा करणारच असा इशारा मनसे आंदोलकांनी दिला आहे.
