#

Advertisement

Friday, November 18, 2022, November 18, 2022 WIB
Last Updated 2022-11-18T11:29:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सचिन वाझे यांना जामीन मंजूर, पण...

Advertisement


मुंबई :  मुंबई सत्र न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र वाझे यांना जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना इतर प्रकरणांमुळे जेलमधून सुटका होणार नाही. ईडीने वाझे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र न्यायालयाने हा विरोध फेटाळला आणि वाझेला जामीन दिला आहे. 
वाझे यांच्या जामीनावर 15 नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानुसार आज 18 नोव्हेंबरला निकाल लागणार होता. ईडीने वाझे यांच्या वर गुन्हा दाखल केला होता. वाझेने सीआरपीसी कलम 88 नुसार जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र ईडीने या जामीनासाठी विरोध केला. मात्र आज अखेर न्यायालयाने वाझेच्या बाजूने निर्णय देत त्याला दिलासा दिला आहे.