Advertisement
मुंबई : केंद्र सरकारच्या आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या निर्णयाचं भाजपकडून स्वागत केलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. तर दुसरीकडे विरोधकांकडू या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करते, आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानं आर्थिक मागास वर्गाला याचा नक्की फायदा होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंडे यांनी यावेळी आरक्षणाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील आभार मानले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयाचं मी स्वागत करते. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला मोठा दिलासा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यापैकी हा एक निर्णय आहे.
