Advertisement
पुणे : 'त्यांन अडीच वर्षे लागली शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला. अडीच वर्ष फिरले असते तर आज ही वेळ आली नसती' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
शिरूर तालुक्यातील केंदूर-पाबळ पाणी पुरवठा योजना कोनशिला अनावरण सोहळयासाठी खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. .मात्र विध्यमान खासदार अमोल कोल्हे मात्र अनुपस्थित होते. यावेळी बोलत असताना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
सिल्लोडला आदित्य ठाकरे दौरा घेत आहे. आता प्रत्येकाला दौरा घेण्याचा अधिकार आहे. आम्ही काय कोणाची स्पर्धा करायला जात नाही. आमचा दौरा हा वेगळा आहे त्या दौऱ्यामधून कळेलच. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडी आश्वासन देण्यापेक्षा सरकारने कृती मधून दाखवून दिले आहे की, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याचं काम या सरकारने केले आहे. पण त्यांना अडीच वर्षे लागली शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचायला, अडीच वर्षांपूर्वी जर या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असा टोला शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
