#

Advertisement

Thursday, November 3, 2022, November 03, 2022 WIB
Last Updated 2022-11-03T12:12:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती सोमवारी 31 ऑक्टोबरला समोर आली होती. यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 2 किंवा 3 नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता आजही शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याचं समोर आलं आहे.
शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार यांना पूर्णपणे बरं होण्यास आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे, असं डॉक्टर म्हणाले. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  शरद पवार यांना बरं होण्यास आणखी एक-दोन दिवस लागणार असल्याने त्यांचा शिर्डी दौराही रद्द झाला आहे. शरद पवार अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आणखी एक -दोन दिवस पूर्णपणे बरं होण्यासाठी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे ते उद्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिरालाही उपस्थित राहू शकणार नाहीत.