Advertisement
परळी : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यातला वाद सर्वश्रूत आहे. अशातच परळी येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला आहे.
बीडच्या परळी येथील गोपीनाथगड असणारी पांगरी गावच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.तब्बल 10 वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे. पांगरी येथेच गोपीनाथ गड आहे. त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची ठरते आणि याच गावातून धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळविल्याने पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वावर गदा आला आहे. पांगरी सोसायटी धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे.
