#

Advertisement

Monday, November 28, 2022, November 28, 2022 WIB
Last Updated 2022-11-28T10:49:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राज्यपाल राजीनामा प्रकरण ; राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

Advertisement

मुंबई  : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहे. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच त्यांनी राज्यपाल पदावरुन पदमुक्त होण्याचे संकेत? दिले की काय, अशी चर्चा रंगली होती. अशी चर्चा रंगली असतानाच राजभवनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देणार, याचं राज्यपालांनी खंडन केलं आहे. राजीनामा देण्याची इच्छा नसल्याचं राजभवनातून आलेल्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे