#

Advertisement

Tuesday, November 8, 2022, November 08, 2022 WIB
Last Updated 2022-11-08T12:19:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही !

Advertisement



मुंबई :  राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांकडून येणारे वक्तव्य आणि प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. सर्व पक्षांनी एकत्र येवून यावर विचार करायला पाहिजे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. मात्र वक्तव्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांचा देखील विचार व्हायला हवा. सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हा विषय संपायला पाहिजे. या आधी कोणी पक्ष सोडले नाहीत का? त्यावेळी पेटी, खोके शब्द नव्हता का? याची सुरुवात कोणी केली? सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना टार्गेट केलं जातं हे देखील योग्य नाही. खोके हा विषय कसा सुरू झाला? एकनाथ शिंदें यांना सारखं बदनाम केलं जात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मी कुणाचं नाव घेतलं नाही, मी टोप्या फेकतो, ज्याच्या डोक्यावर बसेल ती बसेल असंही पाटील यावेळी म्हणाले.