#

Advertisement

Tuesday, November 8, 2022, November 08, 2022 WIB
Last Updated 2022-11-08T12:23:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांची केली कानउघडणी

Advertisement

मुंबई : कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्या मंडळींना जसे नियम लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे', असं म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघडणी केली. 
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानाबाजीवर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्याना जसे लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली पाहिजे, असं म्हणत फडणवीस यांनी सत्तार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसंच, आचारसहिंता दोन्ही बाजूने पाळली पाहिजे. सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. सगळीकडच्या लोकांनी आचार संहिता पाळली पाहिजे मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितलं नाही, तोवर हे शक्य नाही , असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फडणवीस यांनी तक्रार केली आहे.