#

Advertisement

Wednesday, November 23, 2022, November 23, 2022 WIB
Last Updated 2022-11-23T11:59:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मध्यावधी निवडणुकांचे लॉलीपॉप ...

Advertisement

मुंबई :  सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज असून, मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा दावा वारंवार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत वक्तव्य केलं होतं. साजय राऊत  यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी देखील  मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं म्हटलं होतं. आता विरोधकांच्या या दाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना थांबवण्यासाठी  मध्यावधी निवडणुकांचे लॉलीपॉप दिले जात असल्याचा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.याचबरोबर  त्यांनी संजय राऊत यांच्या सेक्युरिटीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तीची सिक्युरिटी ही रिव्हिव कमिटी ठरवत असते. त्यात राज्य सरकारचा कोणताही संबंध  नसतो. आता संजय राऊत ओरड करत आहे, मात्र जेव्हा आमची सेक्युरिटी काढली तेव्हा हेच आम्हाला सामान्य ज्ञान देत होते. आता त्यांनी इतरांना सामान्य ज्ञान द्यावे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.