#

Advertisement

Wednesday, November 23, 2022, November 23, 2022 WIB
Last Updated 2022-11-23T12:09:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत !

Advertisement

मुंबई : ईडी सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटत आहे. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करत आहे. तसे जनरल डायर या राज्यात आले आहेत. त्यांनी ठरवले आहे महाराष्ट्रचे तुकडे करायचे. त्याच दिशेने यांची वाटचाल सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील 40 गावे कर्नाटकात विलीन होणार या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 
सुप्रीया सुळे पुढे म्हणाल्या की,  कर्नाटक सरकारने महाराष्ट्रात असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला आहे. यावर आता राज्यात चांगलाच धुमाकूळ माजला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या कोणत्या कारणाने पुढे ढकलल्या जात आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. प्रतिनिधी किंवा नगरसेवक असेल हा सगळ्यांच्या रोजच्या सुखदुखात असतो हे इलेक्शन तातडीने घेतलंच पाहिजे असं आमचं आधी मत होतं माझा आजही मत आहे. कारण आज सर्वसामान्य जनतेला प्रचंड अडचण होत आहे.