#

Advertisement

Tuesday, November 15, 2022, November 15, 2022 WIB
Last Updated 2022-11-15T15:42:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

Advertisement



ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाडांना मोठा दिलासा देत पोलीस यंत्रणा आणि भाजपला धक्का दिला आहे.  विनयभंग प्रकरणी आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे. अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं होतं. या प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने आव्हाड यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी आव्हाडांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला. आव्हाड यांच्या वतीने गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात लॅपटॉप आणला होता. ज्यावर न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली.