Advertisement
पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला. अनेक मुद्दयांवरुन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे फक्त अडीच तास बसले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.
मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे फक्त अडीच तास बसले. कोरोना काळात ते मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले नाहीत. आता उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका करतात. महाराष्ट्र आजही नंबर वन आहे. फक्त टीका करता येते. तुम्हाला कौतुक करता येत नसेल तर टीका करताना पुराव्यांसह करा असा टोला नारायण राणेंनी लगावला. उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला.
