#

Advertisement

Tuesday, November 8, 2022, November 08, 2022 WIB
Last Updated 2022-11-08T17:34:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अजित पवार पहाटे शपथविधीला गेले तेव्हा किती खोके मिळाले !

Advertisement

मुंबई : 'सुप्रिया सुळे यांच्याकडे काय पुरावे आहेत, हे त्यांनी सांगावं. अजित पवार जेव्हा पहाटे शपथविधीला गेले तेव्हा किती खोके त्यांना मिळाले होते, हे त्यांनी सांगावं. 4 महिने जनतेच्या समस्या बाजूला ठेवून जे राजकारण होत आहे, त्या ऍक्शनला ती रिएक्शन होती. सत्तार यांची जीभ घसरली तर एवढा उहापोह का?,' असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी केला आहे.
'अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे, पण हे का झालं? प्रत्येक आमदार 40-50 लाख लोकांमधून निवडून येतात. मग किती दिवस संयम ठेवणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी सत्तार यांना समज दिला. आम्ही पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो,' असं विजय शिवतारे म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्याकडे काय पुरावे आहेत, हे त्यांनी सांगावं. अजित पवार जेव्हा पहाटे शपथविधीला गेले तेव्हा किती खोके त्यांना मिळाले होते, हे त्यांनी सांगावं. 4 महिने जनतेच्या समस्या बाजूला ठेवून जे राजकारण होत आहे, त्या ऍक्शनला ती रिएक्शन होती. सत्तार यांची जीभ घसरली तर एवढा उहापोह का?,' असा सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. '50 खोके आणि बोके असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवार, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांना डिफमेशनची केस पाठवली जाईल, तयार राहा, उद्या प्रक्रिया सुरू होईल,' असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.