#

Advertisement

Wednesday, November 9, 2022, November 09, 2022 WIB
Last Updated 2022-11-09T12:52:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सुषमा अंधारे म्हणतात 'टायगर इज बॅक'

Advertisement

मुंबई : संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे. हा ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून न्यायालयाच्या या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच संजय राऊत यांच्या घरी जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. टायगर इज बॅक असं ट्विट राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर अंधारे यांनी केलं आहे.
दरम्यान दुसरीकडे  युवासेना नेते वरून सरदेसाई यांनी देखील संजय राऊत यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे. दबाव तंत्राला न घाबरता संजय राऊत जेलमध्ये गेले आता ते परत येत आहेत याचा आनंद आहे. त्यांची मुलुख मैदानी तोफ पुन्हा धडाडणार असा विश्वास युवा सेना नेते वरून सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. 
अरविंद सावंत यांनी सुद्धा संजय राऊत यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार आहे. संजय राऊत यांना जामीन मिळणे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. या निमित्ताने  लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभावर विश्वास वाढला आहे, असं मत ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं आहे.