#

Advertisement

Wednesday, November 9, 2022, November 09, 2022 WIB
Last Updated 2022-11-09T12:39:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अजित पवार "नॉटरिचेबल चर्चे"वर सुप्रिया सुळेंचा खुलासा

Advertisement


मुंबई :  राज्याचे विरोधी पक्षनेते सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला बघायला मिळतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिरापासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत.
काही तासांपूर्वी राजकीय पटलावर विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला ओत आला होता. यावर स्पष्टीकरण देताना प्रत्येकाला त्याचे एक पर्सनल आयुष्य असते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेवर पडदा टाकला. याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते नॉट रिचेबल असू शकतात. म्हणून याचा अर्थ काही राजकीय असेल असे होऊ शकत नाही. असे मत सुळे यांनी व्यक्त केले.