#

Advertisement

Friday, November 11, 2022, November 11, 2022 WIB
Last Updated 2022-11-11T13:17:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्याचं केलं पत्राद्वारे कौतुक !

Advertisement



मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे हटवण्यात आल्याने राज्यातील सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अफजलखानाच्या
ध  करण्यात आलेल्या दिवशीच सरकारने हे काम हाती घेतल्याने शिवप्रेमींनी प्रतापगडावर मोठ्या
संख्येने सहभाग नोंदवला. दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत आणखी काही सूचना केल्या आहेत.
या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देत असल्याचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. 
संभाजीराजे म्हणाले, स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वर संपते, या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली, असे इतिहासकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता.