Advertisement
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरातून अचानक गायब झाले. यानंतर बरेच दिवस अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्याही समोर आल्या. यादरम्यान अजित पवार त्यांनी स्वतःच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी मावळातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, की मी आजारी असल्याने आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. मीडियावर काहीही बातम्या देतात, असं म्हणत अजित पवारांनी नाराज अजित पवार म्हणाले, 'गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबरला मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची', असं म्हणत गायब असणाऱ्या आणि नाराजीच्या वृत्तावर त्यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली
