Advertisement
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून टिका होत आहे. यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुद्धा राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर भडकले आहेत. तसेच त्यांनी यासंबंधी सरकारला आवाहन केले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर वाचाळवीरांना आवरा, असे आवाहन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे. तसेच त्यांनी जबाबदारीने बोलावे. युगपुरुष शिवाजी महाराज यांची तुलना करता येत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
