#

Advertisement

Monday, November 14, 2022, November 14, 2022 WIB
Last Updated 2022-11-14T12:11:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

माजी मंत्री लक्ष्मणरावांनी सोडले "शाब्दीक बाण'

Advertisement

पंढरपूर : भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्यातच माहोळ तालुक्‍याचे माजी आमदार राजन पाटील यांनी या निवडणुकीच्या प्रचारात आपली पाटीलकी आणि आपली मुलं यांच्याबाबत केलेले वक्‍तव्य चांगलेच चर्चेत आले. त्यावर आमदार बाप आणि त्यांची मुलं, या विषावर भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या शब्दीक बाणांनी आणखी घायाळ केल्याने निवडणूक आणि प्रचार संपलेला असतानाही पाटील आणि ढोबळे यांच्यातील चकमक अद्याप थांबायला तयार नाही. मोहोळ तालुक्‍यातील "त्या'वेळच्या आमदारकीच्या कालावधीतील सल अद्यापही लक्ष्मणरावांच्या मनात असल्याचे दिसून येत आहे.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणतात की, राजन मालकांच्या अशा संस्कारामुळे "सैराट'मधील पाटलांची आर्ची म्हणते "ऑल वावर इज आवर', पोरांची नावंच अशी ठेवलीत की पोरं म्हातारी झाली तरी "बाळ'च म्हणून बोलवावं लागणार आणि म्हणूनच कदाचित बालपणात बालीश बुद्धी नको, त्या ठिकाणी वापरल्यामुळे 17व्या वर्षी 302 सारखे गुन्हे दाखल झाले. (302 कलम मर्डर नॉन बेलेबल). ज्या मुलांवर 302 कलम लागतो. जो मर्डर/हत्या केल्याचा गुन्हा आहे आणि लग्नाआधी अनैतिक प्रकारे आपत्य जन्माला घालणे ही संस्कृती मानणारे संस्कार ज्या मुलांवर आहेत आणि याचा अभिमान बाळगणारा "बाप' तालुक्‍याचे नेतृत्व करणार, म्हणजे तालुक्‍यात साखर कारखाना नक्कीच "नावारूपा'ला येऊ शकतो.
साखर कारखान्याची निवडणूक आहे म्हणून लाजं-काजं तरी गोड बोला. पण, अशा निवडक ठेवणीतल्या पाटलांच्या कर्मामुळे "बाई वाड्यावर या', हे वाक्‍य प्रसिद्धीला आले. वासनांध बापाच काळीज गहिवरून गेले आणि विनाराकारण सात्वीक असराफ जीवाची बदनामी झाली. राजांच्या पाटलांची बरोबरी-अहमदनगरच्या पाटलाने करण योग्य नाही! कारण या इतिहासाची तमा बाळगून तरी येणाऱ्या पिढीसमोर योग्य मार्गदर्शक होता येत नसेल तर तरुणांना नको ते सल्ले देण्याचं धाडस तरी करू नका! वयाच्या 17व्या वर्षी 302 कलम लागणं हे आज जेवढ्या अभिमानाने सांगता ना! तेवढ्याच अभिमानाने ती वेळ तुमच्यावर आली होती तेव्हा एक बाप म्हणून त्यावेळी तुमच्या काळजाचं पाणी होऊन कोणा-कोणाच्या वाफ्यात सैरभैर पळत होतात, हे पण एकदा सांगा. लाडका लेक या गुन्ह्यातून मुक्त व्हावा म्हणून तुमचे ठोके चुकलेल्या हृदयाची काय अवस्था होते ते पण असेच जाहीरपणे छाती ठोकून सांगा. मालक, कारण या सगळ्या घटनांचा तालुका आणि मी साक्षीदार आहे!
तालुक्‍यातल्या तमाम लाडक्‍या पोरांना कळू देत! कलम म्हणजे मोरपीसाऱ्यांचा कलम नाही. तो प्रियसीला पत्र लिहायला वापरला जातो. हो कलम-तो कलम आहे ! जो भल्याभल्यांना फासावर लटकवू शकतो! पण पाटील संविधानाच्या व्यवस्थेला आणि कायद्याच्या कलमांना तुम्ही फालतू समजून बोलायची हिम्मत करू नका, नक्षत्रासारखे अडथळे उभे टाकतात. नाहीतर मिसुरड फुटलेल्या तरुणांना अशा बेताल मार्गदर्शनाने ऐन तरुणपणात तुरूंगवास भोगायला पाठवाल याच भान ठेवा. कारण, धडपडणाऱ्या मनोहरभाऊनी तुमची साथ सोडली आहे. मग, माजी मंत्री धनंजयभाऊ असोत अगर माजी आमदार राजन मालक असो! कायदा सर्वाना सारखाच असतो ! परंतु, दोन पाटलातला संघर्ष वाईट असतो. आमदार होण्याच्या रांगेत एकटा संजय कलाल नाही, सहा आमदार स्पर्धेच्या रांगेत आहेत. राष्ट्रवादीला भिती घालण्यासाठी भाजप प्रवेशाची भीती घालताय ही सवय पण जुनीच आहे. परंतु, घायाळ बापाचे जखमी काळीज उघड केले; त्यात नको राजकारण! कारण सैराट घटनेला पाठीशी घालणारा बलदंड पक्ष पाठीशी असल्यावर "नो वरी नो चिंता'! जे वाटले, जे भावले ते आपल्याला सांगितले, अशा शब्दांत प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी टीका केली आहे.