#

Advertisement

Friday, November 18, 2022, November 18, 2022 WIB
Last Updated 2022-11-18T10:43:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सोन्या-चांदीच्या किमती लवकरच वाढणार

Advertisement

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत सतत वाढत असलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने सोने, चांदी आणि पाम तेलाच्या बेस इम्पोर्ट किमतीत वाढ केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील त्यांच्या किमतींवरही परिणाम दिसून येईल. भारतीय बाजारात पामतेल आणि सोन्या-चांदीच्या किमती लवकरच वाढू शकतात. 
वृत्तसंस्था रॉयटर्सने असं वृत्त दिलंय की जागतिक बाजारपेठेत किंमती वाढल्याचा दबाव सरकारवर होता आणि त्यामुळेच सोने आणि चांदी व्यतिरिक्त, सरकारने रिफाइंड पाम तेल आणि आरबीडी पाम तेल या दोन्हींच्या बेस इम्पोर्ट किंमतीत वाढ केली आहे.

सोन्या-चांदीच्या बेस इम्पोर्ट किमतीतही वाढ
सरकारने पामतेलाबरोबरच सोनं आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट किंमतीतही वाढ केली आहे. सोन्याची बेस इम्पोर्ट किंमत 531 डॉलर प्रति 10 ग्रॅमवरून 570 डॉलर प्रति 10 ग्रॅम इतकी वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, चांदीची बेस इम्पोर्ट किंमत 72 डॉलर्सने वाढवली आहे, जी आता 702 डॉलर्स प्रति किलो झाली आहे. ही किंमत आतापर्यंत प्रति किलो 630 डॉलर होती.