Advertisement
बुलढाणा : राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाट पेटला आहे. आज मनसेचे कार्यकर्ते राहुल गांधींची सभा असलेल्या ठिकाणी जात असताना त्यांना पोलिसांनी रोखली. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होते. शेवटी मनसे नेते नितीन सरदेसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपबरोबर मनसे नेत्यांनीही टीका केली आहे. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळीच मनसे कार्यकर्ते काही नेत्यांसह राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, बुलढाण्यातील चिखोली भागात मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अडवलं होतं. यानंतर मनसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. दरम्यान काही वेळानंतर सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे.
