#

Advertisement

Tuesday, November 22, 2022, November 22, 2022 WIB
Last Updated 2022-11-22T11:30:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !

Advertisement




मुंबई : महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीला घातलं होतं, त्यानंतर आता मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गुवाहाटी दौऱ्यात सत्तासंघर्षावेळी ज्यांनी मदत केली त्यांचीही भेट एकनाथ शिंदे घेणार असल्याचं बोललं जात आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. याआधी 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं, पण व्यग्र वेळापत्रकामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला गेला.