Advertisement
मुंबई : छत्रपतींविषयी तुमचे राज्यपाल आणि प्रवक्ते बेताल वक्तव्य करतात, तुम्हाला नक्की काय खुपतय?, धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये. धर्मसत्ता आणि राजसत्तेने एकत्र येऊन लोककल्याणाचे काम करावे ही छत्रपतींनी दिलेली शिकवण तुम्हाला खुपते का? असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे आक्रमक झाले आहेत, त्यांनी भाजपाला सुनावलं आहे.
