Advertisement
राज्यात पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात 7700 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, नांदेड, अहमदनगर, अकोला अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, नाशिक, वाशिम, यवतमाळ अशा 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. 07 नोव्हेंबर 2022 रोजी एक परिपत्र काढून ग्रामपंचायत निवडणूक कशापद्धतीने घ्यावी, त्याची आचारसंहिता प्रत्येक जिल्ह्याला पाठविली आहे. यामध्ये मतदार याद्या, निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदीबाबत सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्वतंत्ररीत्या निवडणूक कार्यक्रम येणार आहे.
