Advertisement
मंगळवेढ्यातील जनतेला "अनुसंध्या' सोहळ्यात भावनिक साद
मंगळवेढा : मंगळवेढा जनतेने भरभरून दिले, त्यांचे खूप उपकार आहेत. आमदार झालो.., मंत्री झालो. जो काही येथे उभा आहे तो आपल्यामुळेच आहे. तुमचे उपकार कधीही फेडता येणार नाहीत. आजही तुम्ही ज्यावेळी कामे घेऊन येता त्यासाठी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीदार यांच्याकडे जाऊन जनतेसाठी काम करताना मोठे बळ मिळते. ढोबळे जे बोलतात तेंव्हा आश्वासन नसते तर ते वचन असत, ते नेहमी पाळत आलो आहे आणि यापुढेही पाळत राहील, अशी भावनिक साद बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी जाहिरपणे घातली.शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्यावतीने बहुजन रयत परिषद आयोजित स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तना सोहळा तसेच महाराष्ट्रातील इडिंयन आयडल प्रतिक सोळसे व कलर्स मराठी, सुर नवा ध्यास नवा फेम राधा खुडे यांच्या गाण्याचा कार्यक्रमापूर्व करण्यात आलेल्या मनोगतात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजातींना एकत्र घेऊन स्वराज निर्माण केले. रयतेला स्वाभिमान दिला. आज "रयत' नावाचे महत्त्वच अनेक जण विसरले आहेत, अशी खंत व्यक्त करीत बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आजच्या व्यसनाधिन पिढीबाबत चिंता व्यक्त करीत संतांचे विचार आणि अधात्म हा खूप मोठा आधार ठरू शकतो, यामुळे आई-वडिलांनी आपल्या तरूण पिढीकडे लक्ष द्यायला हवे, त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा, व्यसनाधिन युवकांना सावरण्याची गरज आज आहे. माय-बापानों झोपताना लष्काराचे आणि जेवताना शेतकऱ्याचे अभार मानावेत, असेही ढोबळे यांनी नमूद केले.
ढोबळे साहेब आमचे "आधार'
यावेळी झालेल्या अनुसंध्या कार्य्रमावेळी मंगळवेढा मतदारसंघातील हजारो गरजू ज्येष्ठांना आधार म्हणून काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात पाच ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठावर "आधाराची काठी' माजी मंत्री ढोबळे यांच्या हस्ते देण्यात आली. "साहेब' यापूर्वीही आमचे "आधार' होते आणि आजही तेच आमचे "आधार' असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

